Description
हिंदू (वैदिक) पुनरूज्जीवनवादी या संघर्षात ‘गुरु तो सकळाशी ब्राम्हण’ असे सांगून ब्राह्मणवर्ग श्रेष्ठत्वाचा दावा करणाऱ्या रामदासांना सर्व प्रयत्ननिशी पुढे आणीत होते. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जसजशी तीव्र होत होती तसतसे रामदासमहात्म्य अधिकाधिक वाढत होते. आपण महाराराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायाच्या इतिहास तपासला तर असे आढळेल की, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरवातीस सर्वात जास्त वाङ्मयनिर्मिती रामदासांच्या जीवन आणि कार्यावर झालेली आहे. हि निर्मिती विनाकारण झालेली नसून ती जाणीवपूर्वक झालेली आहे. स्वातंत्र चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर काळात ब्राम्हणांनी नेतृत्व कसे करावे हा त्यामागील उद्देश होता. तशा प्रकारच्या जाहिराती उघडपणे छापल्या जात होत्या. याचे एक उदाहरण मोठे बोलके आहे. मोरो केशव दामले यांच्या शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत १९२५साली लिहिलेल्या समर्थांचे सामर्थ्य या पुस्तकाची जाहिरात छापलेली आहे. ती या प्रमाने आहे. ”भक्ती, मुक्ती, युक्ती आणि विरक्ती या चतुर्बीजमंत्रात्मक ग्रंथ आम्ही मुद्दाम श्री.आठल्ये यांच्याकडून लिहून घेतला आहे …आणखी सर्वात विशेष हे कि, या आणि त्यात विशेषकरून ब्राह्मणांनीच पुढारी होऊन आपण समर्थ कसे बनावे, हि तर शेवटची गुरुकिल्ली आहे. ह्यामुळे हा ग्रंथ सर्वांगसुंदर झाला आहे. ”हि या वर्गाची रोखठोक भूमिका म्हणजे आपले गतकालीन वैभव आणि समाजातील श्रेष्ठत्व राष्ट्रवादाच्या नावाखाली टिकविण्याच्या निर्धार होता.
Reviews
There are no reviews yet.