Description
भारत देशामध्ये परदेशी आर्यांच्या आक्रमणानंतर सुख- शांती- समृद्धी- सुरक्षितता- विकास या मानवी जीवनासाठी अत्यावश्यक बाबी बहुजन समाजाच्या वाट्यावर आल्या नाहीत. हजारो वर्षांच्या सांस्कृतिक चळवळींच्या लढ्यामध्ये आक्रमक आर्य- ब्राम्हण वर्गाने बहुजन समाजास पराभूतच केलेले आहे. बहुजन समाजावर विजय मिळविण्यासाठी संख्येने कमी असलेल्या आर्य आक्रमकांनी वेळेनुसार तडजोडी केल्या… डावपेच बदलले. पण अंतिम उद्दिष्ट कधीच बदलले नाही. बहुजन समाजाने आता तरी आपल्या पराजयाचे, गुलामगिरीचे, गरिबीचे, अशिक्षितपणाचे, अज्ञानाचे, असुरक्षिततेचे, अंधश्रद्धेचे, अपमानाचे, आपापसातील भांडणाचे, आळसाचे, भीतीचे जाणीवपूर्वक संशोधन करावे. आत्मचिंतन करावे. वैयक्तिक, कौटुंबिक, सामूहिक स्तरावर प्रामाणिकपणे आपल्या मागासलेपणाची करणे शोधावीत. आपल्याला अडचण आल्यास विविध चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षित बांधवास विचारावे. नियमित वाचन करावे. चर्चा करावी. जगात ‘ज्ञान हेच खरे धन’ हे सत्य समजून घेऊन, मेंदूवर बिंबवावे. सर्वच बाबी प्रत्येक व्यक्तीस जशाच्या तशा समजतील असे होत नाही. त्यासाठी चिकित्सा करावी…. आणि मराठा सेवा संघासारख्या चळवळींवर विश्वास ठेवावा.
Reviews
There are no reviews yet.