Description
बी. सी. कांबळे, मूळ गाव सांगली जिल्ह्यातील पलूस. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी. ए. पुणे लॉ कॉलेजातून एल. एल. बी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बोलावून घेऊन त्यांच्या चळवळीचे मुखपत्र ‘जनता’ साप्ताहिकाचे ‘संपादकत्व’ दिले. १९५२ मध्ये मुंबई- असेम्ब्ली गाजविली. १९५४-५५ कॉन्स्टिट्यूशनल लॉचे प्रोफेसर. १९५७ मध्ये लोकसभेवर छाप पडली. पुनः १९७७ मध्ये आणीबाणीवर प्रकाश टाकून लोकसभेत निवडून गेले. ‘अस्पृश्य मूळचे कोण ?’ ‘मराठी भाषिकांचा महाराष्ट्र’, ‘राजा मिलिंदचे प्रश्न’, त्री-पिटक भाग १ ते ४ या ग्रंथाचे भाषांतरकार. ‘वतन-बिलाचा अर्थ व अनर्थ’, ‘बौद्ध धम्मावरील टीकाकारांना उत्तर’ ‘आणीबाणी – ४४ व्या घटना दुरुस्ती बिलावरील विचार’, ‘ऐक्याच्या टीकाकारांना उत्तर’, ‘भारतीय राज्यघटनेची मीमांसा ‘ इत्यादी ग्रंथाचे लेखक. ‘जनता’, प्रबुद्ध भारत’, रिपब्लिक’ साप्ताहिकांचे संपादक. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे एक संस्थापक व सुप्रीम कोर्टाचे वकील.
Reviews
There are no reviews yet.