Description
“आता आम्हाला तुमच्या वंशावळीविषयी जागरुक करायला हवं. द्वेष हा तुमचा बाप आहे आणि असहिष्णुता ही तुमची आई आहे. भ्रम तुमचे पूर्वज आहेत आणि मिथ्या ही तुमच्या ज्ञानाची संपत्ती आहे!” भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांना उत्तर देताना एका लेखात देवनुरु महादेव यांनी केलेलं हे विधान. या विधानाच्या पुष्ट्यर्थ पुरावे देत केलेली मांडणी म्हणजे हे पुस्तक आहे !
द्वेषाला नकार आणि प्रेमाला होकार देण्यासाठीची ही आर्त हाक आहे. संविधानाला रद्दी ‘गोधडी’ म्हणणारा रा. स्व. संघ स्वीकारायचा की स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारं बाबासाहेबांचं संविधान स्वीकारायचं, अशा एका टोकावर आपण पोहोचलो आहोत. या दोहोतून योग्य ती निवड करता यावी, यासाठी हा पुस्तक प्रपंच आहे.
देवनुरु महादेव यांचे हे पुस्तक म्हणजे धोक्याची पूर्वसूचना आहे. आपत्तीत अडकलेल्या व्यक्तीने टाहो फोडून दिलेला ‘SOS’ चा कॉल आहे. झोपलेल्यांना जागं करण्याचा हा प्रयत्न आहे आणि जागं असलेल्यांना नेमकं सम्यक भान देण्यासाठीची ही मांडणी आहे.
“उनका जो काम है वो अहले सियासत जाने
मेरा पैगाम है मोहोब्बत जहां तक पहुंचे”
जिगर मुरादाबादी यांची ही जिगर देवनुरु महादेव यांचीही आहे. वाचकांपर्यंत ती योग्यरित्या पोहोचेल आणि मराठी साहित्यिक, सांस्कृतिक विश्व त्याचं मनापासून स्वागत करेल, असा मला विश्वास वाटतो.
– श्रीरंजन आवटे
Reviews
There are no reviews yet.