Description
या देशाचे अंतिम सत्ताधीश म्हणून
तुम्हाला आणि मला फैसला करावा लागणार आहे.
अमुक पक्ष विरुद्ध तमुक पक्ष अथवा एक नेता
विरुद्ध दुसरा नेता असा हा फैसला नाही.
गांधींचा भारत की नथुरामचा भारत?
माझ्या भीमाचा भारत की ‘कोरेगाव-भीमा’
घडवणाऱ्यांचा भारत?
….असा हा फैसला आहे.
‘बुद्धांचा देश’ आज अशा निर्बुद्धांचा देश
होत असताना, हतबुद्ध होऊन हे सगळं बघत
बसणार आहोत का आपण ?
‘गांधींना जन्म देणारा देश’ ही भारताची ओळख पुसून,
‘गांधींचा खून करणाऱ्यांचा देश’ अशी आपली ओळख व्हावी का ?
‘मनुस्मृतीचं दहन करून समतेचं संविधान देणाऱ्या
बाबासाहेबांचा देश’ ही ख्याती पुसून,
‘मूठभर मनुवाद्यांचा मनीवाद्यांचा देश व्हावा का हा ?’
‘आधुनिकतेच्या वैश्विक आकाशाला गवसणी
घालणाया नेहरूंचा देश’, ही व्याख्या खोडून
‘अविवेकी, आक्रस्ताळ्या धर्मांधांचा देश’ करायचा का हा ?
Reviews
There are no reviews yet.