विचारांचा व्यवसाय, व्यवसायांचा विचार

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव विचारांचा व्यवसाय, व्यवसायांचा विचार
लेखक प्रकाश पोहरे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ७४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७० ग्रॅम

Description

आजचा तरुण दिशाहीन झाला आहे. शिक्षणाचा जो प्रसार खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू आहे तोच यासाठी कारणीभूत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. दहावी पास होणारा शेतकऱ्याचा मुलगा घरच्या गोठ्यातील शेण उचलायचे नाकारतो. शेत विकून त्या पैशाची भरपाई देऊन चपराशी व्हायची इच्छा करतो, हीच खरी कृषी क्षेत्राची अधोगती आहे.  पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्येकाची खरी क्षमता ओळखून त्याला त्या क्षेत्रात वेगळा विकास करायची संधी देणे आज अत्यंत आवश्यक आहे.

‘विचारांचा व्यवसाय – व्यवसायांचा विचार’

हे यासाठी साधन ठरू शकते. पुस्तकी शिक्षणाला जीवनात जास्त महत्त्व न देता आपली अंगभूत क्षमता ओळखून, आपल्याला असलेला एखादा छंद, एखादी अवगत असणारी कला विकसित करून त्यातूनच नवीन चरितार्थाचे साधन निर्माण करता येते.  हाच संदेश द्यायचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.  शेतकऱ्याच्या मुलाची शेतीची आवड जर पुस्तकी शिक्षणामुळे मृत होत असेल तर हे शिक्षणाचे अपयशच म्हणावे लागेल. ‘नका करू आत्महत्या, करा निसर्ग शेती’ हा शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर शेतकरी पुत्रांसाठी तेवढाच विचारपूर्वक प्रहार आहे.  रासायनिक शेतीच्या आणि संकरित वाणाच्या आहारी नेण्याचा पद्धतशीर प्रयास शासनानेच केला आहे.  परिणामी येत्या चाळीस वर्षात येथील शेती ‘वांझ’ ठरू लागली आहे.  रासायनिक खटाने शेत कधीच खतावत नसते.  त्याचा पोत कधीच  सुधारत नसतो. त्याची सुफलता वाढण्याऐवजी कमी कमी होत जाते.  किटकनाशकामुळे  मित्रकिडीचासुद्धा नाश होतो.  हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न कुणीतरी करायची नितांत गरज आज निर्माण झाली आहे.  उद्यमी तरुणांना आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांना सावध करायचा प्रयत्न या पुस्तकातून अनेक लेखांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विचारांचा व्यवसाय, व्यवसायांचा विचार”

Your email address will not be published. Required fields are marked *