Description
कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं.
पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.
इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाड़ं खुली करून दिली.
अल्गोरिदमला आपली गुपितं समजली
आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे.
ए.आय काय करेल ?
नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो याबद्दलचं थरारक कथन … हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी – आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.
” इतिहासातील बारीकसारीक तपशील आणि त्यातले महत्त्वाचे, भव्यदिव्य कल, घटना, प्रसंग यांना एकत्र करण्याची आगळीवेगळी हातोटी हरारी यांच्याकडे आहे. ए. आय चे परिणाम यावर सर्वत्र चर्चा घडत असतानाच्या काळात हे अत्यंत मौलिक पुस्तक प्रकाशित झालं आहे. ”
– मुस्तफा सुलेमान
” विचारप्रवृत्त करायला लावणारं आणि व्यवस्थित कारणमीमांसा करणारं पुस्तक. हरारी आपल्याला वेगाने अवतरत असलेलं भविष्य पाहण्याची दृष्टी देतात, जे एकाच वेळी थरारक आहे आणि रक्त गोठवणारं आहे. राजकारण्यांनी, कोर्पोरेटमधल्या लोकांनी आणि सांस्कृतिक धुरीणांनी – आपण सगळ्यांनीच ‘नेक्सस’ वाचलंच पाहिजे.”
– स्टीफन फ्राय
Reviews
There are no reviews yet.