Description
ती आहे एका शिंप्याच्या पराभवाची, दु:खाची कहाणी. एका मोठ्या गावात शिंप्याचा धंदा करून पोटापुरती कमाई करणारा विठू हा या कथेचा नायक आहे. शहरात आधीच लोकप्रिय असलेले रेडीमेड कपडे आता खेड्यांतही लोकप्रिय होऊ लागतात आणि त्याचा शिंपी धंद्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो. वस्त्रांबद्दलच्या लोकांच्या अभिरूचित झालेल्या बदलामुळे विठूचा धंदा बसु लागतो आणि आधीच दारिद्रयात दिवस काढणाऱ्या विठूचे कुटुंब शेवटी उपासमारीच्या खाईत लोटले जाते.
जेव्हा जेव्हा लोकांच्या जीवनपद्धतीत लहानमोठे बदल होतात, तेव्हा तेव्हा काही प्रस्थापित व्यवसाय आणि सामाजिक संस्था कालबाह्य होवून नष्ट होवून जातात. या परिवर्तन काळात काही अनामिकांचे जीवन सर्वांगाने उद्ध्वस्त होवून जाते. ही समाजात सातत्याने घडत असलेली प्रक्रिया आहे. अशा एका सनातन आशयसूत्रातून या कादंबरीची निर्मिती झाली आहे.
याबरोबर एक गाव, तिथले विस्कळीत होवून अराजकाच्या, अमानवीकरणाच्या सीमेवर पोहोचलेले लोकजीवन याचेही प्रत्ययकारी दर्शन ही कादंबरी घडवते.
Reviews
There are no reviews yet.