Description
”पालाण” (शिवरायांचे आरमार) लघुकादंबरीमध्ये ऐतिहासिक वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. भाषा ओघवती आहे. वाक्यं छोटी असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना समजायला सोपं जाईल. शिवकालातील हत्यारं आणि आरमारासंबंधी असलेली साधनं यांचे तपशील विस्तृतपणे आल्यामुळं महाराजांच्या आरमाराची उत्तम माहिती मिळते. लेखिकेने खूप कष्ट घेतले आहेत, हे ही जाणवते.
महाराजांनी आरमाराच्या निर्मितीसाठी जे काही केले, त्याकडे बहुतेक इतिहासकारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांचे लक्ष अफजल खान वगैरेंच्या प्रसंगांवर केंद्रित झाले आहे. युरोपमधून होणाऱ्या आक्रमणांची महाराजांनी गांभीर्याने दखल घेतली होती, हे त्यांनी आरमाराच्या उभारणीला दिलेल्या महत्त्वावरून स्पष्ट होते.
Reviews
There are no reviews yet.