अण्णाभाऊ साठे कादंबरी खंड २, भाग – १

120.00

Out of stock

पुस्तकाचे नाव अण्णाभाऊ साठे कादंबरी खंड २, भाग – १
लेखक अण्णाभाऊ साठे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५०० ग्रॅम

Description

१ ऑगस्ट  १९२० ला वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै  १९६९ ला मुंबईत निधन झाले. अवघे ४९ वर्षांचे आयुष्य जगलेल्या या कलंदर साहित्यिकाने स्वकर्तृत्वाने आपले नाव साहित्य क्षेत्रात अजरामर केले. वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत दु:खांचे पहाड़ उचलत, शोषित पीडितांचे जगणे साहित्यात अधोरेखित केले. शाहिरी, कथा-कादंबरी, वगनाट्य, प्रवासवर्णन, पटकथा  इत्यादी साहित्यप्रकारात लेखन करून माणसातील माणूसपण जपले. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या जीवनातील व्यथा, वेदना लेखनातून मोकळ्या केल्या. दबलेल्या, पिळलेल्या नागवलेल्या माणसातला माणूस पुढे आणला अन अन्याय, अत्याचार करणाऱ्याचा बुरखा फाडला. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करता निगर्वीपणे जगला जागवला.

तत्कालीन समाजमनाची स्पंदने अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीमधून आविष्कृत होतात. कल्पनाविलासापासून दूर असलेले अण्णा भाऊंचे कादंबरी लेखन माणसाचे वास्तव जगणे सांगून जाते. उपेक्षित आणि प्रस्थापितांचा संघर्ष हा अण्णा भाऊंच्या लेखनाचा आत्मा आहे. समकालीन भवताल अधोरेखित करताना अण्णा भाऊंच्या लेखणीची शाई सदैव संवेदनशीलच राहिली आहे. याचे चित्रण ‘रानगंगा’, ‘पाझर’,  ‘ ‘अलगुज’, ‘मास्तर’ आणि ‘कुरूप’ या कादंबऱ्या या खंडात आल्या आहेत. समकालीन जीवनदर्शन व मूल्यात्मक जग हा या कादंबऱ्यांचा विशेष होय.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अण्णाभाऊ साठे कादंबरी खंड २, भाग – १”

Your email address will not be published. Required fields are marked *