Description
संजय बासू हे कोलकत्ता विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे पदवीधर. जाहिरात उद्योगांमध्ये २५ वर्षाचा दीर्घ अनुभव. प्रिंट मीडियाच्या अनेक शाखांसोबत काम केल्यानंतर कोलकात्त्यामध्ये असलेल्या एका जाहिरात संस्थेचा कार्यभार सांभाळला. तोट्यात गेलेल्या अनेक संस्थांना नफा मिळविणाऱ्या संस्थांमध्ये परिवर्तित केले आणि या संस्थांना देशाच्या विविध भागांमध्ये पोहिचविले. मागील दोन वर्षांपासून माहिती अधिकाराच्या माध्यमातून नीती संशोधनावर काम करत आहेत
संजॉय बासु
नीरज कुमार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवातच माहिती अधिकारावर काम करण्यातून केली. यांना कित्येक भ्रष्टाचार विरोधीकाम करणाऱ्या लढाऊ आणि आर. टी. आय कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सन २०१० साठी त्यांनी राष्ट्रीय आर. टी. आय पुरस्काराचे नेतृत्व केले. माहिती अधिकारासंबंधित यांचे अनेक लेख वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. द मंजुनाथ ट्रस्ट च्या मदतीने त्यांनी राष्ट्रीय आर. टी. आय हेल्पलाइनची स्थापना केली. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी ‘माहितीचा अधिकार ‘ (जानने का हक्क ) या कार्यक्रमाची निर्मिती केली.
नीरज कुमार
शशी शेखर हे व्यवसायाने पत्रकार असून त्यांना १५ वर्षाचा पत्रकारितेचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पत्रकारिकेत पदव्युत्तर डिप्लोमा केला असून सध्या ते दिल्लीमधून प्रकाशित होणाऱ्या एका महत्त्वाच्या पाक्षिका सोबत काम करतात. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरवात आर. टी. आय या नियतकालिकाचे संपादन हि केले. यांनी ओवैस शेख यांचे Sarabjit Singh, A Case Of Mistaken Identify या पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे.
शशी शेखर
Reviews
There are no reviews yet.