Description
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु महासभा आणि त्यातही विशेषत: संघाची कार्यवाही व त्यामुळे देशभरात जे वातावरण निर्माण झाले त्यामुळेच गांधीजींच्या खुनाची घटना घडली, असे आम्हाला मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट होते. गांधीजींच्या खुनाच्या कटात हिंदु महासभेतल्या जहाल विचारवादी गटाचा देखील सहभाग होता. याबाबत माझ्या मनात तीळमात्रसुद्धा शंका नाही.
संघ नेत्यांची भाषणे जातीयवादाच्या विषाने भरलेली असतात. संघाच्या चिथावणीनेच महात्मा गांधींची हत्या झाली आहे. संघाच्या लोकांनी गांधीजींचा खून झाल्यानंतर मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही लोकांनी संविधान सभेच्या दर्शक गॅलरीमध्ये शिरुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्यांना रोखण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अतिशय धोकादायक संघटन आहे.
तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक ब्राह्मणांचे एक संघटन आहे, यात न अस्पृश्य आहेत न मराठे. आता तुम्ही तुमच्या पूर्वजांनी लावलेल्या विषवृक्षाचे फळ चाखत आहात. आता पुन्हा तुम्ही नवीन विषवृक्ष लावण्याची सुरुवात करीत आहात. याचे वाईट परिणाम होतील. तुम्हाला संघ तयार करायचा आहे तर करा, पण जातीभेद मिटविण्यासाठी, वर्णव्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी संघटना तयार करा. भूतकाळातील चुका सुधारा. असे संघटन पुन्हा ब्राह्मण चित्पावनांची सत्ता कायम करु शकणार नाही.

Reviews
There are no reviews yet.