Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीची चाके मंदावली. पावसाळ्यातील भुई छत्र्यांप्रमाणे आंबेडकरी विचारवंत आणि चरित्रकार उगवले. बाबासाहेबांची चरित्रे आणि चळवळीबद्दलचे ग्रंथ यांचा खच पडायला लागला. बाबासाहेबांच्या समकालीन सोम्या- गोम्यांची जणू काही आपणच त्यांचे अगदी जवळचे सहकारी अशा थाटाने आठवणी लिहिल्या. त्यात बाबासाहेबांपेक्षा या अनुयायांच्याच विचार नि चरित्राचे प्रतिबिंब जास्त. शिवाय त्यात असंख्य काल्पनिक घटनांचा प्रक्षेप केला गेला. चुकीचे अन्वयार्थ लावून खरे चरित्र व चळवळ धूसर करून टाकली गेली. बाबासाहेबांच्या चळवळीच्या मारेकऱ्यांना हवे तसे लिहून दिले. त्याच्या मोबदल्यात अनेकांनी सत्तेचा चतकोर, पदाच्या खुर्च्या भिकार मनोवृत्तीने मिळवून स्वत:चे खिसे भरले, प्रसिद्धी आणि पुरस्कारांनी धन्य धन्य झाले. बाबासाहेब आणि त्यांची चळवळ सर्व शोषितांपर्यंत पोहचवून त्यांना स्वत्व व संघर्षाची जाणीव करून देण्यासाठी उपयुक्त ठरणारे माध्यम अनेकांनी स्वार्थाने स्वत:साठीच वापरले; हा विषाद मनात खदखदतो आहे.

Reviews
There are no reviews yet.