Description
समाजाचं प्रबोधन, परिवर्तन, दिग्दर्शन करणारं, तसेच सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अज्ञानाचा काळोख घालविण्यासाठी उत्कट भावना आणि निष्ठेने केलेले लेखन हे असं प्रश्नांकित होत असते काय ? चळवळ गतिमान राहावी, तिला अडविणारे अवरोध बाजूला सारून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्या मनातला संभ्रम दूर सारून अचूक मार्ग आणि सम्यक् धम्म दिग्दर्शित करण्यासाठी अशा लेखनाचे महत्त्व अधोरेखित करता येते. पुढारी आणि नेत्यांना त्यांचे कर्तव्य, निष्ठा, बांधिलकी आणि विचारसूत्राची, तसेच पदाचीही आठवण देऊन, त्यांच्याही प्रबोधनाचं कार्य, त्यांची प्रशंसा आणि वेळप्रसंगी जहाल टीका-टिप्पणी करूनही करता येते. आणि हे प्रत्येक युगात, शतकात आणि दशकात झालेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा मी अभ्यासक, समीक्षक किंवा भाष्यकार नाही; मात्र त्यांच्या पत्रकारितेचा उद्देश समाजाचं प्रबोधन करून समाजालाच अन्यायाविरुद्ध पेटविणे आणि बदलाची पार्श्वभूमी तयार करणे हाच होता. आजही ते लेखन वाचलं जात आहे, त्यामधून योग्य तो बोध घेतला जात आहे. म्हणूनच त्यांनी प्रवर्तित केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाचं शताब्दिवर्ष अख्ख्या जगात साजरं होत आहे. हे सगळं उमेद देणारं, नवचैतन्य निर्माण करणारं आणि आशा पल्लवित करणारं वास्तव आहे.
Reviews
There are no reviews yet.