Description
राजमाता जिजाऊंची शिवरायांच्या जडणघडणीत किती प्रभावी भूमिका होती, ” जिजाऊ किती सावधपणे शहाजीराजे आणि शिवराय यांना प्रेरणा डेट राहिल्या, ते कवीन्द्र परमानंदाने देवीच्या तोंडाचे उदगार नोंदवण्याचे निमित्त करून शब्दबद्ध केले आहे. ‘ शहाजीराजांची पत्नी जिजू पृथ्वीतलावर जागृत आहे, ‘ हेच ते उदगार. राजमाता जिजाऊ विषयीचे हे उदगार ऐकल्याबरोबर आपले अवघे अस्तित्व जागृतीच्या आव्हान स्पर्शाने रोमांचित आणि प्रफुल्लित होते! जागृती , जागृती आणि जागृती! जागृतिविना जीवनात काहीही साध्य होत नाही. अर्थात जिजाऊंची जागृती ही स्वराज्य स्थापनेच्या ध्यासामुळे डोळसपणे स्वत:हून स्वीकारलेली कर्तव्यदक्ष आणि इतिहासाचा पाया घातला गेला. स्वाभिमानी स्वप्नांची प्रेरणा केली गेली. एका लावण्यशाली युगाचे प्रवर्तन होऊ शकले. एकीकडून शहाजीराजांना स्वराज्याची पार्श्वभूमी तयार करता आली आणि दुसरीकडून शिवरायांना कर्तृत्त्वाचा बहर दाखवून स्वराज्याची निर्मिती करता आली. राजमाता जिजाऊंच्या विविध गुणांची जोड शहाजीराजांच्या आणि शिवरायांच्या गुणांना मिळाली. या समन्वयातून एका नव्या समाज रचनेची पायाभरणी झाली.”
- डॉ. आ. ह. साळुंखे
Reviews
There are no reviews yet.