Description
रामपत्नी म्हणून सीतेची प्रतिमा आजवर ‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक अशीच रंगवली गेली आहे. सीता सोशिक होती खरीच, पण संधी मिळाली तेव्हा तीनेही रामाविरुद्ध विद्रोह केला. भूमिकन्या असलेल्या सीतेने पुन्हा भूमीचा आश्रय घेणं, हा लोक परंपरेन तिचा विद्रोहच मानला आहे. अभिजन परंपरा आणि लोकपरंपरांचं नातं कायमच कधी विसंवादी असं राहिलेलं आहे. सीतेच्या संदर्भात तर भारतीय लोकमनाने कायमच सीतेला झुकत माप दिलं आहे. मराठी, हिंदी, कन्नड़, बंगाली, बौद्ध, जातककथा ते अगदी आदिवासी कथांमध्ये रामापेक्षा सीतेचच गुणगान गायलेलं दिसतं.
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या नेहमीच लोकसंस्कृतीचा अभ्यास मातृसंस्कृती म्हणून करत आल्या आहेत. एकूणच लोकसाहित्याची स्त्रीवादी अंगाने त्यांनी केलेली मांडणी लक्षणीय आहे. त्याच अनुषंगाने सीतेच्या वेदनेचा – विद्रोहाचा जो सूर त्यांना वेगवेगळ्या लोकरामायनांत सापडला, त्याचा मागोवा म्हणजे हे सीतायन !
Reviews
There are no reviews yet.