Description
सत्यशोधक समाजाने, समाज स्थापनेपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत मराठी मुलूख दणाणून सोडला होता. पुणे, मुंबई, ओतूर, सासवड, करजगाव, बनसेंद्रे, नायगाव, बेलोरा आदी परिसरात तर समाजाने क्रांतिकारी कार्य केले. असेच एक क्रांतिकारक सत्यशोधक संघटन ओतूरातही होते. जुन्नरचे अफगान भाऊ पाटील आणि त्यांच्या ओतूरकर सहकाऱ्यांनी ओतूर अभियोगाच्या माध्यमातून एक क्रांतिकारी सामाजिक इतिहास घडविला. या अभियोगामुळे इसवी सन १९२६ साली जोशी वतनच कायद्याने रद्द झाले. हा सामाजिक क्रांतिकारी इतिहास आता धूसर होत असतानाच, सत्यशोधकी चळवळीतील संशोधक जी. ए. उगले यांनी आमचाच सामाजिक क्रांतिकारी इतिहास, आम्हाला आणि तमाम मराठी मुलखाला मोठ्या संशोधकीय परिश्रमातून सांगून, एक इतिहास घडविला. त्यांच्या या ऐतिहासिक सत्यशोधकीय कार्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन !
Reviews
There are no reviews yet.