Description
नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन व्यक्तित्त्व आणि क्षमता या साऱ्यांमुळे त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात एक अपूर्व असे स्थान आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या निर्णायक अशा शेवटच्या पंचवीस वर्षात त्यांची भूमिका एका सामाजिक क्रांतिकाऱ्याची होती आणि या कालखंडात ते एका अद्वितीय राजनीतिज्ञ योद्ध्याच्या स्वरूपात आपल्याला सामोरे येतात. सोप्या आणि प्रवाही भाषेत लिहिलेले त्यांचे हे चरित्र भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि त्यातील नेताजींची भूमिका याचा समतोल इतिहास वाचकांना निश्चित देईल.
शिशिरकुमार बोस 1920-2000 हे भारतात असहकाराची शांततामय चळवळ ऐन भरात असताना जन्माला आले. त्या चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर खूपच पडल्याने ‘ भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रीय भाग घेऊन आपली भूमिका निभावली. नेताजींचा राजकीय आणि तात्विक वारसा जपण्यासाठी डॉ. बोसांनी नेताजी संशोधन संस्था (नेताजी रिसर्च ब्यूरो) स्थापन केली. व्यवसायाने ते बालरोगतज्ञ होते, तरी त्यांचा अभ्यास व संशोधन मुख्यत: सुभाषचंद्राच्या संदर्भातच अधिक आहे. याखेरीज पुस्तक प्रकाशन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन व नेताजीविषयक ध्वनिफीती व चित्रपट तयार करण्यात ते गुंतलेले असत.
Reviews
There are no reviews yet.