Description
प्रकाशित लेखन :१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित वैचारिक वाङ्मय (२००५) (वैचारिक)
३. अगतिक वर्तमान (२०१२) (कवितासंग्रह)प्रस्तुत पुस्तकाच्याद्वारे डॉ. नीळकंठ शेरे यांनी नामदेव ढसाळ यांच्या वैचारिक गद्यलेखनाची चिकित्सा तटस्थपणे केली आहे. डॉ नीळकंठ शेरे हे तरुण पिढीतील महत्त्वाचे आंबेडकरवादी अभ्यासक आहेत नामदेव ढसाळाचे गथलेखन, स्फुटलेखन व भाषणे यामधून त्यांनी मांडलेली भूमिका, व्यक्त केलेले विचार यांचे विषयवार वर्गीकरण करून त्याची सुसंगत व एकत्रित चर्चा या पुस्तकात केलेली आढळते नामदेव ढसाळ यांची अन्वेषण आणि मूल्य दृष्टी ही मार्क्स व आंबेडकरवाद याचा समन्वय साधणारी आहे हे या पुस्तिकेतून स्पष्ट होते.
नामदेव ढसाळांच्या लेखनात वर्ण, जात, वर्ग, स्त्रीदास्य अंताची भूमिका आढळते तथापि ढसाळ त्यांच्या संपूर्ण आयुष्यात विचार आणि कृती याची सांगड घालू शकले नाहीत हे साधारणपणे मांडताना ढसाळांच्या स्पष्ट व बिनधास्त भूमिकेची चिकित्साही केलेली आहे. अगोदरच्या पिढीच्या वैचारिक लेखनाचा नंतरच्या पिढीने मांडलेला हा लेखाजोखा मूलतः वाचनीय व दिशादर्शक आहे.
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.