Description
” जया अंगी मोठेपण, तया यातना कठीन ” ह्या न्यायानं सावित्रीबाईंनी कठीण यातना भोगल्या. ज्यांना सामाजिक रुढींचे पारंपारिक बदल करायचे असतात त्यांना प्रचलित समाजधारणेंविरोधात पाऊल टाकावीच लागतात. मात्र ज्वलंत तत्त्वनिष्ठा असल्याशिवाय, निर्भयपणे संकटांना तोंड देण्याची मानसिक, शारीरिक तयारी असल्याशिवाय, अंगी मोठेपण कसे येईल …? परंतु वरील गुणांचा समुच्चय सावित्रीबाईंच्या अंगी असल्यामुळे त्यांनी समाजसुधारणेची धुरा सहज पेलली. मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर सुरू असताना प्लेगग्रस्त महाराचे मुलांस वाचवून त्यांनी हसत – हसत अगदी सहजपणे मृत्यूला आपल्या पाशात घेतलं. त्या काळातील महान समाज सुधारकांनी फुले उभयंतावर स्तुती- सुमने उधळून त्यांचे कर्तृत्वास उजाळाच दिला आहे. त्यांत प्रबोधनकार ठाकरे, गाडगे महाराज, बाबासाहेब आंबेडकर ह्या विचारवंतांनी त्यांच यथोचित कौतुक करून त्यांनी आपल्या साहित्यात त्यांना सन्मानाची जागा दिली आहे.
Reviews
There are no reviews yet.