मराठा राजवटीतील चलने आणि टांकसाळी
₹30.00 ₹27.00
10 in stock
पुस्तकाचे नाव |
मराठा राजवटीतील चलने आणि टांकसाळी |
लेखक |
महादेव गोविंद रानडे |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
-- |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
४० ग्रॅम |
Description
मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना माहीत असते की, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 1664 मध्ये शिवरायांनी स्व:ताला राजा म्हणून घोषित केले, आणि स्व:ताची नाणी आणि टांकसाळ सुरू केली. ही टांकसाळ रायगडावर 1664 मध्ये सुरू करण्यात आली. त्यातून चांदीची आणि तांब्याची नाणी पाडण्यात येत असत. तांब्याच्या नाण्यांवर एका बाजूला ‘श्रीराजाशिव’ असे कोरलेले होते. दुसऱ्या बाजूला ‘छत्रपति’. या नाण्यांना ‘शिवरायी पै’ म्हणत. तांब्याच्या नाण्याबाबत एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे. मराठा राजवटीच्या काळात ते सलगपणे चालू राहिले. आणि जरी साताऱ्यात शाहू आणि रामराजा आणि कोल्हापुरात संभाजी आणि त्यांच्या वारसांनी त्यांची नाणी काढली असली, तरी पेशवाईच्या आणि मराठ्यांच्या सत्तेच्या अंतापर्यंत दीडशे वर्षे ही शिवरायी पै नाणी आपली ओळख आणि अस्तित्त्व बाजारात टिकवून होती. शिवरायी पै नाण्याचे वजन दहा मासा असे. म्हणजे तोळ्याच्या 10/12 भाग. याच्या दुप्पट किंमतीचा, दोन पै मूल्याचा ढब्बू पैसा वीस मासा वजनाचा असे.
Reviews
There are no reviews yet.