महात्मा गांधी : जीवनचरित्र

103.00

Out of stock

पुस्तकाचे नाव महात्मा गांधी : जीवनचरित्र
लेखक कृष्ण कृपलानी
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २२४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८२ ग्रॅम

Description

महात्मा गांधीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा आणि त्यांच्या महान कार्याचा, मनाची पकड घेईल अशा रोचक भाषेत, हा ग्रंथ तुम्हाला परिचय करून देतो. गांधीजी सर्वसामान्य भारतीयांच्या हितासाठी जगले,झिजले आणि त्यांनी त्यांच्यासाठी आत्मबलिदानही केले; हे खरे, परंतु तरीही येथील देश-काल आणि परिस्थीतीशीच तेव्हडे त्यांचे जीवन निगडित होते, असे म्हणता येणार नाही. एक महान देशभक्त आणि क्रांतिकारक सुधारकाग्रणी म्हणूनही भावी पिढ्या त्यांचे स्मरण करू लागल्या तर ते वर्णनही अपुरेच पडेल. कारण, गांधीजींचे जीवन आणि तत्वज्ञान विश्वव्यापक असून त्यांचे नैष्ठिक शक्तीचे अधिष्ठान लाभले आहे. पृथ्वीतलावावरील मानवांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे सामर्थ्य त्यात सामावले आहे. कारण गांधीजींच्या जीवनाला आणि विचारप्रणालीला शाश्वत, चिरंतन मूल्य लाभले आहे.
श्री कृष्ण कृपलानी यांची स्वातंत्र्य युद्धातील सैनिक म्हणून ख्याती आहे. शांतिनिकेतनात शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या जीवनकार्यास प्रारंभ केला. सन १९३३ ते १९४१ पर्यंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या निकट सहवासात राहून अध्यायानाचे कार्य करीत असतानाच त्यांनी तेथे ‘विश्वशांती’ या टागोरांनी सुरु केलेल्या त्रैमासिकाचे यशस्वी संपादनही केले. साहित्य अकादमीचे ते पहिले सचिव होते. सन १९५४ ते १९७० पर्यंत सहा वर्षे ते राज्यसभेचे नामनियुक्त सदस्य होते. पदमभूषण सन्मान त्यांना प्राप्त झाला होता.
रवींद्रनाथ टागोरांचे जीवनचरित्र, आधुनिक महात्मा :गांधीजी, टागोर-जीवनचरित्र, द्वारकानाथ टागोर, आधुनिक भारत :राममोहन रॉय ते रवींद्रनाथ टागोर हि त्यांची काही निवडक साहित्य निर्मिती होय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा गांधी : जीवनचरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *