लोकनेते राजर्षी शाहू महाराज काळ आणि कार्य

108.00

Out of stock

पुस्तकाचे नाव लोकनेते राजर्षी शाहू महाराज काळ आणि कार्य
लेखक रा. ना. चव्हाण
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ९८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १५१ ग्रॅम

Description

गेली 50-55 वर्षे आपण सत्यशोधक चळवळीचा प्रेरक संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे अविरत कार्य केले आहे. आपण महाराष्ट्रीय समाजाचे एक थोर प्रबोधनकार  आहात  आणि आयुष्यभर आपण समता, स्वातंत्र्य, बंधुता  आणि न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला आहे . हयातभर आपण जीवनाला प्रकाशित  करणाऱ्या विचारांची  साधना केली. हे आपले कार्य मंडळाला महाराष्ट्रातील फुले – आंबेडकर कुलाचे कार्य वाटते. समाजातील पीडितांच्या मुक्ती युद्धातील आपणही आमचे एक आदरणीय सेनानी आहात.

‘सत्यशोधक  ज्योतिबा फुले ‘, ‘सार्वजनिक  सत्यधर्मासार ‘, ‘महर्षी शिंदे यांच्या आठवणी ‘ ही बहुमोल पुस्तके आणि आठशेच्या करा वैचारिक  लेख लिहून समाजक्रांतीची मशाल धगधगती ठेवण्यात आपण वाटा उचलला .

आपण आयुष्यभर हे समाजकार्य केले पण त्याचा  गवगवा कधी केला नाही . आपले व्यक्तिगत विनयशील आणि प्रसिद्धिपराड़्मुख  आहे. सत्यशोधक चळवळीला सामर्थ्य देणाऱ्या प्रकाशयात्रिकांच्या मालिकेत आपल्याही संयमशील व्यक्तिमत्त्वाचा अंतर्भाव इतिहासकाराला करावा लागेल. आज – उद्याच्या परिवर्तनवादी चळवळींना आपले कार्य आणि पद्धती विशेष  मार्गदर्शक  ठरण्यासारखे आहे .

आपला हा गौरव महोत्सव म जोतीराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांनी पहायला हवा . तरच आपल्या व्यापकता समजून घेता येईल.

आपले हे वैचारिक धन यापुढल्या  मोलाचे वाटेल आणि ते त्यांचे सतत मार्गदर्शन  करता राहील . ”

यशवंत मनोहर

अध्यक्ष , महाराष्ट्र  राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,

कोल्हापूर , दिनांक 1 सप्टेंबर 1989  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकनेते राजर्षी शाहू महाराज काळ आणि कार्य”

Your email address will not be published. Required fields are marked *