Description
मूलतः दादासाहेबांचा पिंडच सामाजिक कार्याचा असल्यामुळे त्यांनी मानवी हक्क बजावणारे चवदार तळे आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहासारखे सामाजिक लढे मोठ्या स्फूर्तीने लढले. मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांच्या ठाम व कणखर नेतृत्वामुळेच त्यांचा सत्याग्रहींवर जबरदस्त प्रभाव होता. दादासाहेबांनी उभारलेल्या सर्वच चळवळींचा केंद्रबिंदू तळागाळातील माणसांचा उत्कर्ष हाच होता. दादासाहेबांना समाजकार्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यांना समानतेचा दर्जा मिळवून देणे व त्यांचे प्रश्न सोडवणे हे आपल्या जीवनाचे ध्येय मानले होते. भूमिहीनांच्या सत्याग्रहामुळे कर्मवीर दादासाहेबांनी समाजाला श्रेष्ठ कोटीच्या मानवतेची ओळख करून दिली. विशेषतः काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये व्यग्र असल्याकारणाने पाच वर्षे चाललेल्या या संपूर्ण लढ्याचे खरे नेतृत्व दादासाहेबांनीच केले. हा लढा सतत पाच वर्षे चालवण्यात दादासाहेबांचे खंबीर नेतृत्व, शिस्तप्रियता, संघटन कौशल्य, समयसूचकता, कर्तव्यनिष्ठा, योजकता, वक्तृत्वशैली आणि तळागाळातील लोकांच्या उद्धाराची तळमळ इत्यादी गुणवैशिष्ट्यांचे अनोखे दर्शन घडते. कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या शब्दांत व्यक्त झालेली उत्कट भावना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याला गौरवांकित करते.
“तू रानच्या पाखरांनाही भीमायन
गायला शिकवलेस
प्रकाश आणि हवेला जयभीम
बोलायला शिकवलेस
महाडच्या तळ्यातील पाण्याला
आग लावून
भीमाला तू बलदंड केलेस.”
Reviews
There are no reviews yet.