Description
हिंदूतत्त्वज्ञान नमूद करण्यापूर्वी, बाबासाहेब त्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी स्पष्ट करण्याकरिता, काही चर्चा करतात. जसे ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ असते, त्याचप्रमाणे हिंदुत्ववादाच्या तत्त्वज्ञानाकडे पहावयाचे काय ? तसे म्हणता आले असते तर बरे झाले असते असे ते म्हणतात. परंतु दोन कारणास्तव त्यांना तसे म्हणणे परवडणारे वाटत नाही. पाहिले कारण असे की, धर्म म्हटला की त्याता निश्चितपणा असतो. मात्र तत्त्वज्ञान म्हटले की त्यात मोघमपणा असतो. दूसरे कारण असे की, धर्म व तत्त्वज्ञान हे एकमेकांचे वैरी नसले तरी विरोधक आहेत. त्यामुळे एका बाजूला ईश्र्वरवादी व दुसऱ्या बाजूला तत्त्वज्ञानी, असे दोघे एकमेकांची टिंगल उडवून त्यांचा एकमेकातील विरोध कसा दाखवीत असतात, याचे बाबासाहेबांनी उदाहरण दिले आहे. ईश्र्वरवाद्यास बाबासाहेबांनी धार्मिक असे मानलेले आहे. या दोघांचा वाद रंगात येतो तेव्हा ईश्वरवादी हां तत्त्वज्ञानास असे म्हणून हीणवत असतो की, ”ज्या अंधेऱ्या खोलीत मांजर नसते, अशा ठिकाणी मांजराचा शोध घेणाऱ्या आंधळ्या माणसासारखा तू तत्त्वज्ञानी आहेस.” प्रत्युत्तरादाखल तत्त्वज्ञानी ईश्वरवाद्यास उलट असे म्हणून हिणवतो की, ”मांजर नसलेल्या अंधेऱ्या खोलीत मांजराचा शोध घेणाऱ्या आंधळ्यासारखा तू ईश्वरवादी तर आहेसच, त्याच्यापुढेही तुझी कडी अशी की, मांजर नसताना देखील मांजराचा शोध लावल्याचेही जाहीर करणारा तू आहेस.”
Reviews
There are no reviews yet.