गोळवलकरवाद एक अभ्यास

135.00

Out of stock

पुस्तकाचे नाव गोळवलकरवाद एक अभ्यास
लेखक शमसुल इस्लाम
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

गोळवलकरांच्या जीवनाविषयीच्या आणि श्रद्धांविषयीच्या वास्तविक पुराव्यांना समोर आणण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. असे करण्यासाठी मी पूर्णपणे गोळवलकरांचे मौल्यवान साहित्य, संघाची प्रकाशने, अभिलेखागारातील उपलब्ध सामग्री आणि संघाच्या अशा अनेक दस्तऐवजांवर विश्वास ठेवला आहे. आजपर्यंत हे दस्तऐवज अनुपलब्ध होते आणि गेल्या ३५ वर्षांच्या कालखंडात देशाच्या विविध भागांतून मी ते संग्रहित करू शकलो आहे. गोळवलकरांना व्यवस्थित जाणून घेता यावे यासाठी या पुस्तकाबरोबरच गोळवलकरांनी सन १९३९ मध्ये लिहिलेल्या ‘वुई और अवर नेशनहूड डिफाईन्ड’ (आपण किंवा आपली राष्ट्रीयत्वाची व्याख्या) या वादग्रस्त पुस्तकातील अनुवाद करण्यात आलेला मूळ भागही दिला गेला आहे. ‘आपण किंवा आपली राष्ट्रीयत्वाची व्याख्या’ हे संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना समजूनघेण्यासाठीचे सर्वात महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. सन १९४७ नंतर हे पुस्तक अनुपलब्ध आहे. या पुस्तकाच्या लेखकाविषयी कितीही वादविवाद असले तरी (संघाच्या मते हे पुस्तक कोणी लिहिले ते कोणालाही माहिती नाही.) माझा असा विश्वास आहे की या पुस्तकामधून मी हे पुस्तक पुन्हा उपलब्ध करून दिले आहे, संघ आणि हिंदुत्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी ते उपयुक्त ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गोळवलकरवाद एक अभ्यास”

Your email address will not be published. Required fields are marked *