Description
महाडच्या क्रांतीत महार हेच बिनीची आघाडी उघडणार व चालविणार हे उघड होते. आणि त्यांना विरोध करण्यासाठी ब्राह्मणादी सवर्ण हिंदू येणार, हेही उघड होते. देवदेवस्कीच्या कल्पनेचा अंमल असलेल्या या स्पृश्य व अस्पृश्य कोकणस्थांवर या सत्याग्रहाच्या क्रांतीच्या ठिणग्या पडतील व ती कल्पना जळून जाईल, अशाच इतर धार्मिक कल्पना जळून जातील आणि प्रथम अस्पृश्य समाज धार्मिक कल्पनांच्या जाळ्यांतून मुक्त होईल आणि त्या अस्पृश्यांना पाहून स्पृश्य समाज आपल्या अंतर्यामातील अंध:कार नष्ट करावयास तयार होईल. अशा प्रकारची स्पृश्य व अस्पृश्य समाजात धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीत क्रांती घडवून आणणे यासाठी महाड हे ऐतिहासिक स्थळ बाबासाहेबांनी मुक्रर केले.
Reviews
There are no reviews yet.