Description
- लिव्हरपूलापासून लंडनला रेल्वेने जावयाचे, पण तिकिटाला लागणारे पैसे भीमरावांच्या जवळ नव्हते. ते तिकीट न काढता आगगाडीत बसले. त्यांच्या डब्यात एक लंडनचा रहिवासी होता. त्याला लंडनच्या अलीकडे उतरावयाचे होते. लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ कोने आहे व तिकडे कसे जावे, याबद्दल भीमरावांनी त्या गृहस्थाकडे चौकशी केली. त्या गृहस्थाने जो पत्ता दिला तो भीमरावांनी शर्टाच्या डाव्या हाताच्या कपवर पेन्सिलीने लिहून घेतला. आपल्याजवळ तिकीट नाही व मध्येच कोणी पकडले तर काय, या विचारांनी भीमराव थोडा वेळ अस्वस्थ झाले होते, पण गाडी चालू असता त्यांच्या डब्यात रेल्वेचा तिकीटचेकर आला नाही. स्टेशनवर उतरल्यावर ते प्लॅटफॉर्मवर इकडून तिकडे फिरत राहिले व निर्धोकपणे स्टेशनच्या बाहेर पडले.
- ‘मि. फुले यांस सूचना अशी की, जर त्यांस आपल्या जातिबंधूंची सुधारणा कर्तव्य असेल तर ती ‘गुलामगिरी’च्या सारखे ग्रंथ तयार केल्याने व जे आपणांहून सर्वप्रकारे श्रेष्ठ त्यांस नुसत्या शिव्या दिल्याने ती होणार आहे असे मुळीच नाही. ब्राह्मण कितीही लबाड असले व कितीही दुष्ट असले तरी, एक गोष्ट निर्विवाद आहे की, ज्ञानभांडाराच्या किल्ल्या त्यांच्या कंबरेला आहेत. त्यांच्या साहाय्याशिवाय इतर जातींस ज्ञानाचा लाभ होण्याचा बहुधा मुळीच मार्ग नाही.’ (माला, पा. १०२४).
Reviews
There are no reviews yet.