Description
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली ? या पुस्तिकेत डॉ यशवंत मनोहर यांनी मनुस्मृती केव्हा आणि कशी निर्माण झाली. तिचा लेखक कोण आणि मनुस्मृतीमधील विषमतेची भीषणता इत्यादी गोष्टींचा नेटका विचार केलेला आहे .
मनुस्मृतींने स्त्रियांच्या, शूद्रातिशूद्रांच्या, आदिवासी आणि भटक्या – विमुक्तांच्या अनेक पिढ्या जाळल्या. मनुस्मृति ही घृणेचे अत्यंत जलाल असे प्रसारमाध्यम आहे . कोट्यवधींच्या माणुसकीची होळी करणाऱ्या या मनुस्मृतीची होळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ” Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. it is a living past’ and therefore as really present as any present can be.” मनुस्मृती आजही परिवर्तनाच्या लहानमोठ्या प्रयत्नांना जाळतेच आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेली मनुस्मृती प्रत्येकानेच आपापल्या मनातून जाळून टाकायला पाहिजे हे सांगण्यासाठी डॉ यशवंत मनोहरांनी या पुस्तिकेतून मनुस्मृतीमधील विषमतेच्या जहराचा नेटका परिचय करून दिला आहे.
Reviews
There are no reviews yet.