Description
देवदासी म्हणजे देवाची दासी. देवाची पत्नी. देवाची सेवा करणे, हे तिचं काम. देव सर्वांचा असतो म्हणून देवदासीही सर्वांची या न्यायाने या देवदासीला भोगदासी बनवलं गेलं. कथित देवाच्या नावानं जगणारी ही देवदासी अनेकांच्या वासनेची शिकार बनली. काहींनी देवा – धर्माचा आधार घेऊन तिचा भोग घेतला. आपलया दासीची, पत्नीची अशी अवहेलना होत आहे, याची देवाला कधीच लाज वाटली नाही. देवदासी जन्मतच राहिल्या. स्वत:ला विकत राहिल्या. चोंडक्याच्या आवाजात स्वत:च्या वेदना दडवत राहिल्या. देवदासी प्रथा बंद करण्यासाठी शासनाने कायदे केले, पण ते सर्वच पुस्तकात अडकून पडले. प्रथा बंद करण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे धाडस सरकारनं केलं नाही. समाजपरिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यांनी, महिला मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी, समाजसुधारकांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊनच या प्रथेला सुरूंग लावायला हवा.
देवदासीला नको आहेत केवळ कोरडे शब्द किंवा वांझोटी सहानुभूती. तिला हवंय परिवर्तन. नवं आयुष्य. ते देण्यासाठी जाणीवपूर्वक, प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तरच ही प्रथा संपेल.
Reviews
There are no reviews yet.