Description
अद्भुताचे मानवी स्वभावाला असलेले आकर्षण व सामूहिक अबोधाद्वारा आपल्या मेंदूत संक्रमित होणाऱ्या आदिम धारणा यामुळे माणूस धर्माच्या हीन परंपराच्या आधीन जातो. भूत, पिशाच्च, देव – देवता यांचा संचार मानवी शरीरात होतो व आपल्या इच्छा त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकतात. ही अशीच एक आदिम धारणा. बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या लाखो अनुयायांमध्ये या धारणेविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनंतर कोणी केला नाही. त्यामुळे अनेकांच्या अंगात भूत, पिशाच्चे येतात. भानामतीच्याही घटना नेहमी घडतात. आणि दु:खाची गोष्ट अशी की, त्यावर उपाय म्हणून गावोगावी असलेले बौद्ध भिक्खू मंत्र टाकून किंवा मंतरलेले पाणी, धागा, राख देऊन भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करतात. अनेकांच्या अंगात बुद्ध, आंबेडकर येतात. बौद्ध बांधवांनी या समस्येवर गांभीर्याने विचार करायला हवा. याचबरोबर परित्राणपाठा सारखी कर्मकांडेही कमी करायला पाहिजेत. बौद्ध भिक्खूंनी बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून त्या आधारे बुद्धाचा विचार समाजात पसरवायला हवा. विपश्यनेच्या मार्गाने सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले हे खरे. पण विपश्यना व ध्यान या मार्गाने आपण गतानुगतिक ब्राह्मणी धर्माकडे तर वळत नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.