Description
”शिक्षण हे असे प्रभावी साधन आहे की ज्या साधनाच्या साह्याने तुम्ही संपूर्ण जग बदलू शकता” असे महत्त्वपूर्ण विधान नेल्सन मंडेला यांनी केले आहे. त्यांच्या या उद्गारातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. जगामध्ये ज्या ज्या राष्ट्रांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात जी आमूलाग्र अशी क्रांती (बदल) घडवून आणली आहे, त्यांच्या या प्रगतीचे रहस्य त्यांच्याकडील प्रभावशाली अशा शिक्षण व्यवस्थेमध्येच दडलेले आहे. पाश्चात्य राष्ट्रांनी शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले केले, शिक्षणाची संधी सर्वांना समान असल्याने शिक्षणाच्या माध्यमातून तिने सामाजिक विकास घडून आलेला दिसतो.
तथागतांनी हे तत्त्व आणि मार्ग माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा जाणला आणि शिक्षण खुले केले . मानवी जीवनातील तृष्णा आणि दु:खापासून मुक्ती पाहिजे असेल तर समाजाला प्रगतीशील शिक्षण दिल पाहिजे, आणि त्यांनी धम्म सांगितला, आचारणात आणला, तथागतांच्या शिक्षण क्रांतीचा इतिहास डॉ. चिकटे यांनी अगदी साध्या, सोप्या, सरळ ओळीत मांडला आहे. या क्रांतीची ज्योत सर्वकाळामध्ये प्रज्वली रहावी म्हणून ‘चरथ भिक्खवे…!’
Reviews
There are no reviews yet.