Description
वैदिक धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शिव ही तीन मुख्य दैवते मानली गेली आहेत. ख्रिस्ती धर्मात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिहींना प्राधान्य दिले आहे, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात बुद्ध, धर्म आणि संघ या त्रयीला श्रेष्टत्व मिळाले आहे. बौद्ध धर्म वैदिक किंवा ख्रिस्ती धर्मापेक्षा प्राचीन असल्यामुळे त्याचे अनुकरण वैदिकांनी आणि ख्रिसत्यांनी केले असावे असे कित्येकांचे अनुमान आहे . या अनुमानाला संख्येचे साम्य या पलीकडे काही आधार असेल असे मला वाटत नाही. पुराणातील त्रिमूर्तींनी किंवा बायबलातील त्रयीची बहुतेक सर्व श्रोत्यांस माहिती असेलच. परंतु बौद्ध धर्मातील त्रिरत्नांची पारख अद्यापि आमच्या बांधवांपैकी बऱ्याच जणांस झाल्याचे दिसून येत नाही. तेव्हा आजच्या या पहिल्या व्याख्यानात या रत्नांपैकी पाहिले रत्न बुद्ध त्याची, बौद्धांचा मूळग्रंथ जो त्रिपिटक त्यास अनुसरून, थोडीशी माहिती आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.
Reviews
There are no reviews yet.