Description
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या वर्षी आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने स्थानिक इतिहासलेखनाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्य चळवळीमधील कोपरगाव तालुक्याच्या योगदानाची चर्चा करणे आवश्यक आहे. कोपरगाव पुरातन काळापासून ऐतिहासिक नगरी आहे. पौराणिक काळात महर्षी शुक्राचार्य, कच- देवयानी, संजीवनी पार व बेट परिसर, देवी-देवता, यादवकालीन मंदिर स्थापत्य, गोदावरी नदीचा परिसर, शिवकाळ व पेशवेकालीन कोपरगावचे महत्त्व, आधुनिक काळातील महर्षी जनार्धन स्वामी यांची समाधी, साखर उद्योग, सहकार धुरीण मा. ग. रा. औताडे, मा. के. बी. रोहमारे, मा. दादा शहाजी रोहमारे, मा. सुर्यभानजी वहाडणे, माजी खासदार भीम बडदे, मा. ना. स. फरांदे, सहकार महर्षी मा. शंकराव काळे व मा. शंकरराव कोल्हे यांच्या योगदानामुळे विकसित सहकार चळवळ, शैक्षणिक नगरी म्हणून विकास, श्वेतक्रांतीचे स्थान असलेला मा. नामदेवरावजी परजणे गोदावरी दुध संघ इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचे केंद्र म्हणून कोपरगाव तालुक्याचा नावलौकीक झाला आहे.
स्वातंत्र्य चळवळीतही कोपरगाव तालुका मागे नव्हता. तालुक्यातील १६३ स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. १८५७-१९४७ पर्यंतच्या या सर्व घटनांची मुद्देसूद माहिती, असहकार चळवळ, मिठाचा व जंगल सत्याग्रह, चले जाव आंदोलन, झेंडा सत्याग्रह, भूमिगत क्रांतिकारकांचे कार्य… या सर्व घटकांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.