Description
‘मुक्त झालेला मी चांभार’ असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२०) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या ‘बेगमपुरा’ या गीतातून मांडले. बेगमपुरा एक आधुनिक जातिविहीन, वर्गविहीन, 1 करमुक्त आणि दुःखमुक्त शहर ! ब्राह्मणी कलियुगाच्या दुःस्वप्नाच्या (डिस्टोपिया) थेट विपरीत असा हा कल्पितादर्श.
प्राच्यविद्या अभ्यासक, राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी अशा सर्वांच्या प्रेरणा नाकारत गेल ऑम्वेट यांनी पाच 9 शतकांच्या कालखंडातील दडपलेल्या समाजातील द्रष्ट्या विचारवंतांच्या भूमिकेला एका जागतिक दृष्टिकोनाच्या परिप्रेक्ष्यात गुंफले आहे. हे द्रष्टे विचारवंत आहेत 1 चोखामेळा, जनाबाई, कबीर, रविदास, तुकाराम… कर्ताभज, फुले, इयोथी थास, पंडिता रमाबाई, पेरियार आणि आंबेडकर! गांधींचा ‘आदर्श खेडे’ हा रामराज्याचा कल्पितादर्श, नेहरूंचा हिंदुत्वाची किनार असलेला ब्राह्मणी समाजवाद आणि सावरकरांचा पारंपरिक भूप्रादेशिक हिंदू राष्ट्रवाद या सर्व कल्पितादर्शाना या विचारवंतांचे दृष्टिकोन छेद देतात, त्यांचा प्रतिवाद करून मांडणी करतात.
Reviews
There are no reviews yet.