बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार

160.00

1 in stock

पुस्तकाचे नाव बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार
लेखक प.  ल.  वैद्य
ISBN 01030303030
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ११०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा भारतीय भूमीवर अनेक विचारसरणींचे मंथन घडवून आणणारा होय. भारतीयांना लागू पाहात असलेला भारतीयत्वाचा शोध आणि जागतिक राजकारणाच्या संदर्भात होत असलेली विविध आंदोलने, परिवर्तने ह्यांनी समाज मन ढवळून निघण्याचा तो दैदीप्यमान काळ म्हणता येईल.  वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनासोबतच वैदिकेतर धर्मांच्या पुनर्शोधाची, पुनर्माडनीची तीव्र आकांक्षा ह्या काळातील अभ्यासकांमध्ये आढळते.  ह्याच कालखंडाच्या सुमाराला भारताच्या किनाऱ्यावर येऊन थडकलेले मार्क्सवादाचे गलबत आणि आनंद कुमारस्वामी, डेव्हिस, धर्मानंद कोसंबी यांच्यासारख्या विद्वानांनी बौद्ध धर्माचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध ह्या सगळ्या बौद्धिक वातावरणाची पार्श्वभूमी श्री.  प.  ल.  वैद्य ह्यांनी लिहिलेल्या बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार ह्या छोटेखानी पण महत्त्वाच्या आशा ग्रंथाला आहे.  ‘इचलकरंजी- व्याख्यानमाले’त दिलेल्या व्याख्यानांना ग्रंथरूप मिळून १९२६ साली प्रकाशित झालेल्या ह्या ग्रंथाचे स्थान गेली कित्येक दशके मराठी वाचकांच्या आणि अभ्यासकांच्यामध्ये एका वाचनसुलभ संदर्भ ग्रंथांचे राहिले आहे . गौतम बुद्धाआधीची धर्ममते, त्यांचे वर्गीकरण, बौद्धधर्माचे नीतिप्रधान स्वरूप, बुद्धांचे जीवनवृत्त, बुद्धजीवनाशी जोडलेल्या – गुंफल्या गेलेल्या मिथककथा, बुद्धानंतर बौद्ध धर्माचा पंथोपपंथाद्वारे झालेला विस्तार, महायान – हीनयान, त्रिपिटक, देशज भाषांचे स्थान, भारताबाहेर, ब्रह्मदेश, तिबेट, जावा – सुमात्रा इत्यादी बृहदभारत द्वीपकल्पापासून ते चीन व जपान अशा पूर्वेकडच्या दूरदेशांतरी बौद्ध धर्माचा झालेला प्रसार ह्याचे ओघवते समालोचन ह्या पुस्तकात आहे. भाषेचा सुगमपणा हे ह्या ग्रंथाचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.  त्यामुळेच जवळपास शतकभरापूर्वीचा आणि अतिशय संदर्भ संपृक्त  ग्रंथ असूनही आजच्या अभ्यासकाला यातील मराठी भाषा क्लिष्ट किंवा दुर्बोध वाटत नाही.      

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बौद्ध धर्माचा अभ्युदय आणि प्रसार”

Your email address will not be published. Required fields are marked *