Description
”अण्णा भाऊंना ज्यांनी जोखले, त्यांच्याजवळ तराजू होते; पण त्यात वजन नव्हते. अण्णा भाऊंना ज्यांनी मोजले. त्यांच्याजवळ फुटपट्टी होती, पण त्यावर परिमाण नव्हते, ज्यांनी त्यांना पारखले. त्यांच्याजवळ कस होता, पण दृष्टी नव्हती, पण तरीही त्यांनी निकष लावले, भाष्य केले, बरेवाईट लिहिले, कित्येकदा अनुल्लेखाने मारले. पण त्या बिचाऱ्यांना हे माहीत नव्हते. की तेजाला वजन, उंची, खोली नसते. ते फक्त दीपवणारे असते. अण्णा भाऊ तेज होते ते चिरकाल तेजतच राहणार आहेत. वाङ्मयाचं अण्णा भाऊंनी साग्रसंगीत केलेले हे जेवणाचं ताट तुमच्यासमोर ठेवत असताना त्यांनी फोडणी देताना वापरलेल्या साऱ्या पदार्थांच प्रमाण कसय हे तुम्हाला यातून कळणार आहे. त्यांनी वापरलेल्या साऱ्याच पदार्थांचं प्रमाण हे बेताचं असल्याने त्याचं प्रमाण कुठंही कमी जास्त न होऊ दिल्याने त्यांच्या वाङ्मयाची चव बदलत नाही. तीच रुचकर चव चाखायला तुम्ही सज्ज असालच. अनेकांनी ही चव चाखली पण आहे. पण मी त्याकडं ज्या दृष्टिकोनातून पाहिलं, अभ्यासलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न इतकचं !
Reviews
There are no reviews yet.