आपण हिंदू का नाही?

108.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आपण हिंदू का नाही?
लेखक मर्झबान जाल
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ११२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९५ ग्रॅम

Description

मर्झबान जाल हे सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज्, भारतीय शिक्षण संस्था, पुणे इथे प्राध्यापक आहेत. ‘द सिडक्शन्स ऑफ कार्ल मार्क्स’, ‘झोरास्ट्रियनिझम : फ्रॉम अँटिक्विटी टू द मॉडर्न पीरिअड’ व ‘द न्यू मिलिटंट्स’ अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. जाल हे अभिजातवादी मार्क्सवादी आहेत आणि शिवाय फ्रॉइडीयन चिकित्सासिद्धांतकारही आहेत. मार्क्स व फ्रॉइडच्या परात्मता सिद्धांतांवर त्यांचे संशोधन आधारलेले असते. मानवतेच्या वास्तवाभासीकरणाचा मार्क्सचा सिद्धांत व फ्रॉइडचा मज्जाविकृती व मनोविकृतीचा सिद्धांत यांची सांगड ते घालतात. मज्जाविकृती व मनोविकृती यांना मनोविकाराच्या दोन स्पष्ट टप्प्यांमधे विभागणारे मनोविश्ले आता कालबाह्य झाले असल्याचा दावा त्यांनी अलीकडेच केला आहे. त्यांच्या मत मज्जाविकृती व मनोविकृती यांचं एकत्रीकरण ‘मज्जाविकृती – मनोविकृती’ म्हणून झालेले आहे. जागतिकीकरणामधील जगासमोरचा फासीवाद व हिंसा हे भांडवलशाहीचे व साम्राज्यवादाचे प्रश्न आहेत, तसे ते ‘मज्जाविकृती- मनोविकृती’ चेही प्रश्न आहेत, असा त्यांचा दावा आहे. समकालीन समाजातील समस्या म्हणून मज्जाविकृती- मनोविकृती समजून घेण्याचा त्यांचा आग्रह आहे. मानवता मानणारी संकल्पना पर्यायी समाजाच्या केंद्रस्थानी ठेवली जाईल आणि मानवतेला परात्मतेपासून मुक्त करणारा कार्यक्रम आखला जाईल अशा लोकराजकारणाच्या प्रारूपाचं समर्थन ते विचारसरणीय व वैज्ञानिक संभाषिताद्वारे करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपण हिंदू का नाही?”

Your email address will not be published. Required fields are marked *