Description
‘इतिहासाचे विकृतीकरण’ हि बऱ्याच दिवसांपासून प्रकाशित व्हायची राहिलेली पुस्तिका आज आपणापुढे ठेवीत आहे. यवतमाळ येथील शासकीय शिक्षण महाविद्यालयाच्या स्नेहसंम्मेलनामध्ये ‘बदलते वास्तव व इतिहासलेखन’ या विषयावर २००३ च्या दरम्यान भाषण दिले होते. त्याचे लिखित स्वरूप देशोन्नतीच्या रविवार पुरवणीत प्रकाशित झाले होते. आज या पुस्तिकेत ते समाविष्ट करीत आहोत.
‘गोब्राम्हण प्रतिपालकचे मूळ’ हा सा. चित्रलेखामधील ‘असत्याची सत्यकथा’ या लेखमालेतील लेख २००६ मध्ये प्रकाशित झाला होता. तो या ठिकाणी प्रकाशित करण्यात संपादक मा. ज्ञानेश महाराव यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे ‘महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी’ आयोजित पहिल्या पुणे येथील मराठा इतिहास परिषदेत दिलेले अध्यक्षीय भाषण (दि. ८ मे २०१०) तसेच सांगली येथे ९ मे २०१० रोजी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनातील परिसंवादात दिलेले ‘इतिहासाचे विकृतीकरण’ हे भाषण या ठिकाणी प्रकाशित करीत आहोत.
तुळजापूर येथे होत असलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या विशेष अधिवेशनात (७ जानेवारी २०१२) रोजी हि पुस्तिका प्रकाशित होत आहे. हि आनंदाची गोष्ट आहे
-अशोक राणा
Reviews
There are no reviews yet.