Description
“औरंगजेबाच्या शेवटच्या सात वर्षातील ताराबाईचा पराक्रम इतिहासात सदैव झळकणारा आहे. ताराबाईचा हा गौरव केवजातीयांनीच केलेला नसून मुसलमान लेखांतही त्याचा ध्वनी भरपूर उमटलेला आहे. राजारामांच्या मृत्यूने आपले मनोरथ सिद्धीस जाणार असे बादशहास अल्प काळ वाटले असेल, तर लगेच त्याला दिसून आले की राजारामाची बायको नवन्यापेक्षा जास्तच कजाख आहे. खाफीखानाने तिच्या चातुर्याची फार फार वाखाणणी केली आहे.
– इतिहासकार रियासतकार सरदेसाई
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय धैर्याने आणि असामान्य विशेने परकीय मोगली सत्तेशी हयातभर झुंज दिली. शिवरायाचा हा लढा ताराराणीने नंतर चालू ठेवला. हा लढा होता स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी! ताराराणीने देशभक्तीचे कण हाती बांधून अन्यायी, जुलमी मोगल सम्राट औरंगजेबाशी झुंज दिली. म्हणूनच ताराराणी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात कधीही न पुसला जाणारा सुवर्ण ठसा उमटवून गेली आहे. ताराराणीची राष्ट्रनिहा तर प्रखर होतीच, शिवाय तिचे युद्धकौशल्य आणि राजकीय डावपेच थक्क करून सोडणारे होते!”
अॅडमिरल ओमप्रकाश मेहता
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.