स्वराज्यसारथी जिजाऊ

90.00

Out of stock

पुस्तकाचे नाव स्वराज्यसारथी जिजाऊ
लेखक संजय गायकवाड
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८४ ग्रॅम

Description

राष्ट्रमाता जिजाऊ या सिंधू संस्कृतीतील निऋतीचा वारसा चालवणाऱ्या महानायिका आहेत. वीरकन्या, वीरपत्नी,वीरस्त्री, वीरमाता, वीरआजी , विरमातृका, विरप्रेरिका, वीरज्ञानी, वीरमहाराणी, वीरभगिनी, वीरस्नुषा असणारे ते एकमेव व्यक्तिमत्व आहे. जिजाऊ या केवळ शिवरायांच्या मातोश्रीच नाहीतर संबंध स्त्रीसमूहाच्या, मानवांच्या प्रेरिका आहेत. आद्य मातृका निऋतीपासूनची हि परंपरा जिजाऊत एकवटली आहे. जिजाऊंचे हे प्रेरक रूप समजून घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. त्यातूनच वर्तमानातील ज्ञानाचे शिखर गाठता येईल.
जिजाऊंवर हजारो पुस्तके लिहिली गेली पाहिजेत. विविध भाषांमधून त्यांच्या चरित्राचा प्रसार – प्रचार झाला तर एक संस्कारक्षम पिढी घडेल. स्त्रियांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शिवरायांची प्रेरणा त्या आपल्या मुला – मुलींना देऊ शकतील. हे संस्कार मिळाले तर संविधानाला अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय हि मूल्य वास्तवात यायला वेळ लागणार नाही. डॉ. संजय गायकवाड यांनी हे चरित्र लिहून खूप महत्त्वाचे शिवकार्य केले आहे. नवीन वाचकांना जिजाऊंचे जीवनकार्य थोडक्यात या पुस्तकातून कळणार आहे. हि जमेची बाजू आहे. त्यांनी जाधव व भोसले या दोन्ही घराण्याचा थोडक्यात मागोवा घेतला आहे. शिवरायांच्या गुरु व सर्वस्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ याच आहेत हे सप्रमाण सिद्ध करून सत्य व वास्तव इतिहास मांडला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराज्यसारथी जिजाऊ”

Your email address will not be published. Required fields are marked *