शिवरायांचा उदय

18.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शिवरायांचा उदय
लेखक अशोक राणा
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २३ ग्रॅम

Description

भारताच्या उत्तर व दक्षिण भूप्रदेशाला सांधणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्राचा किनारा, उत्तर दक्षिणेला पसरलेला अरबी समुद्राचा किनारा. अरबांनी याची भूभागातून भारतात प्रवेश केला त्याची आठवण करवून देणारा तो अरबी समुद्र. या समुद्राच्या ‘गिरीजनक’ (पर्वत निर्मितीच्या) हालचालीमुळे वर उचलला गेलेला जमिनीचा भाग म्हणजेच सह्यादी पर्वत. कोकण किनारपट्टीला जवळजवळ समांतर अशा उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी महाराष्ट्राचे कोकण व देश (पश्चिम महाराष्ट्र) असे दोन भाग केले आहेत. लाव्हा खडकांच्या थरांचे काळे व उघडे कडे महाराष्ट्राच्या राकटपणाचे रहस्य उलगडवीत, ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे वर्णन करायला कवीला भाग पाडतात. तसेच ‘उंच हिमालय तुमचा – अमुचा केवळ अमुचा सह्यकडा’ असा सार्थ अभिमानही या ताशीव कड्यांनीच मराठी मनात निर्माण केला आहे. या कड्यांमध्ये जगप्रसिद्ध अजिंठ्याची लेणी कोरल्या गेल्या आहेत. भारतीय चित्रकलेचा समृद्ध वारसा जपणारी बौद्ध चित्रकलेची जन्मदात्री अजिंठा लेणी. तशीच जुन्नर येथील चैत्य व विहारेही. प्राचीन काळी एक बौद्धनगरी होती म्हणून जुन्नरचे स्थान इतिहासात नमूद आहे. येथील शिवनेरी किल्ल्याच्या दर्शनी भागातच दिसणारी पूर्व-पश्चिम दिशांना असलेली बौद्ध लेणी या गोष्टींची साक्ष देतात. अशाच एका बौद्ध चैत्यामध्ये शिवाईदेवीची साधी-सुधी दगडी मूर्ती आहे. या देवीच्या स्थानावरून या किल्ल्याला शिवनेरी हे नाव पडले असावे. भारतमातेच्या कमरेला लटकलेली तलवार असे ज्या सह्याद्री पर्वताचे वर्णन केले जाते, त्या सह्याद्रीच्या रांगेमध्येच शिवनेरी किल्ला आहे. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवनेरी येथील किल्ल्यात देशाला दिलासा देणारे एक मूल जन्माला आले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवरायांचा उदय”

Your email address will not be published. Required fields are marked *