Description
औरंगजेबाच्या कैदेत असताना शंभूराजांना मोगलांच्या राज्यकारभाराविषयी जवळून माहिती मिळाली. त्याचप्रमाणे औरंगाबादला शहजादा शाह आलम आणि मुअज्जम यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली. त्यातून राजकारणाच्या वेगळ्याच पैलूचा परिचय त्यांना झाला. या मैत्रीचा फायदा घेऊन शिवरायांनी मोगलांनी बळकावलेले किल्ले स्वराज्यात परत आणले आणि त्यांना औरंगजेबाकडून ‘राजा’ हा किताब प्राप्त झाला. शंभूराजांच्या राजकारणाचे हे एक यश आहे. त्यामुळे स्वराज्यात त्यांचे महत्त्व कमालीचे वाढले होते. परिणामी स्वराज्यातील कारकुनांच्या मनात त्यांच्याविषयी असूया निर्माण होणे स्वाभाविक होते आणि तसेच झाले. स्वराज्यातील सैनिक आणि प्रजा यांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवराज सरकारकून आणि कारकुनांच्या मनात सतत सलत असे. शंभूराजांचा राजकीय उलाढालीतून आलेल्या अनुभवांनी निर्माण झालेला आत्मविश्वास आणि प्रजेप्रती असलेली करुणेची भावना त्यांना स्वराज्यविरोधी वाटू लागली.
Reviews
There are no reviews yet.