Description
रामचंद्र अमात्य – प्रणीत आज्ञापत्र हा शिवप्रभूंच्या स्वराज्य – नीतीवरील सूत्रग्रंथ आहे. शिवछत्रपतींनी भारताच्या इतिहासात जे युगांतरकारी कर्तृत्व गाजवले आणि स्वराज्याचा जो महान आदर्श निर्माण केला, त्याचा रहस्यार्थ ज्यात घनीभूत जाला आहे. असा ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र.
आज्ञापत्राच्या शब्दाशब्दांत शिवप्रभूंची आत्मशक्ती अमात्यांनी गोचर बनविली आहे. शिवछत्रपती हा महाराष्ट्राचा नव्हे भारताचा राष्ट्रीय आदर्श आहे. त्यांच्या चरित्र चिंतनात आणि त्यांच्या जयजयकारात आम्ही मराठी मानसे तन – मन – धन विसरतो. त्यांच्या संस्मरणाने आमच्या तनामनावर अष्टभावांची फुले फुलतात. त्यांचा वारसा सांगताना आमच्या शब्दात काळाला आव्हान देण्याचे सामर्थ्य येते आणि त्यांच्या विराट व्यक्तिमत्त्वाच्या रहस्याचा सर्वांगीण साक्षात्कार घडावा म्हणून आमचे समूहमन नित्य उत्कंठित होते.
या उत्कंठेला तृप्तीचे वरदान देण्यासाठी निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र. हा ग्रंथ म्हणजे शिवकालीन स्वातंत्र्य – युद्धाच्या महाभारतातील गीता आहे.
Reviews
There are no reviews yet.