Description
पर्यटन म्हणजे नुसते फिरणे नव्हे. किल्ले, लेणी पाहायच्या असतील तर आमच्या जुन्नर तालुक्यात म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या जन्मभुमीत या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. याच तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. निसर्गाने नटलेली व सुजलाम सुफलाम असलेली ही भूमी. आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बिनसुद्धा याच तालुक्यात आहे. अनेक प्राचीन मंदिरे आणि निसर्गाचे मुक्तहस्ते वरदान लाभलेला हा जुन्नर तालुका.
जुन्नर तालुक्यात किल्ले शिवनेरी, नारायणगड, चावंड, हडसर, जीवधन, ओझर, लेण्याद्री, वडज, कुकड़ेश्वर, माळशेज, नाणेघाट, दरयाघाट, मानमोडी लेणी, भूतलेनी , तुळजालेणी आहेत. नाणेघाटातील वर्ग व वर्गमुळांचे सिद्धांत, नागनिका राणीचा इतिहास, ज़कातीचा रांजण, मराठी भाषेचे मूळ, अंकगणित, अंकशास्त्राचे पुरावे नाणेघाटात आहेत. हे या पुस्तिकेत साधार मांडले आहे.
Reviews
There are no reviews yet.