Description
” आम्ही शामियान्यात जाऊन पोहोचलो .
तो शामियाना अतिशय महागड्या कपड्याने त्यार केलेला होता .
त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर नसली तरीही तो श्रीमंत वाटत होता .
शामियान्याच्या मधोमध राजाकी गादी व्यवस्थित रक्यूँ ठेवलेली होती .
त्यावर मख़मलीचे कापड अंथरले होते .
लोडतक्क्यांवर मोठ्या प्रमाणात सोन्याचे काम केलेले….
तेवढ्यात आपल्या दोन मंत्र्यांना घेऊन ‘तो’ आला..
त्याच्या पायात सुवर्णजडीत मोजडी होती.
अंगावर महागडी वस्त्रे आणि त्यावर सोन्याच्या तारांचे काम….
डोक्यावर जिरेटोप सुद्धा सोन्याच्या कलाकुसरीने नटलेला…
हातात सोन्याची मूठ असलेली आणि विविध रत्नांनी रंगवलेली तलवार,
म्यानेवर सोन्याचे काम.. असा तो सर्वार्थाने श्रीमंत, सुलक्षणी पराक्रमी
‘शिवाजीराजा’ आमच्या समोर येऊन उभा होता..
त्याच्या तेजाने आम्ही दिपून गेलो..”
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून- एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली…. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मानव म्हणजेच “म-हाटा पातशाह…
Reviews
There are no reviews yet.