Description
छत्रपतींची बदनामी करणाऱ्या जेम्स विल्यियम लेनच्या पुस्तकाला पुराव्यासह सडेतोड उत्तरे देणारा अपूर्व ऐतिहासिक ग्रंथ …
डॉ. म. दा. नलावडे हे बौद्ध काल आणि मराठा इतिहास यांचे चोखंदळ अभ्यासक व संशोधक आहेत. त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक संशोधन करून प्रस्तुत ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा वाचकांना नव्याने परिचय करून दिलेला आहे. शिवाजी महाराज हे, त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्यापेक्षा तीन वर्षांनी ज्येष्ठ होते. व्यंकोजी राजे यांचा जन्म 1630 सालचा. परंतु व्यंकोजी हे जिजाबाईसाहेब यांचे चिरंजीव दाखवून त्यांची जन्माची तारीख दाखविली आहे. जेम्स लेनने तेच केले आहे. शिवजन्मतिथि व दादोजी कोंडदेव यांचा संबंध जोडण्याचा अनेकांनी चुकीचा प्रयत्न केलेला आहे. कै. न. चि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सन 1930 मध्ये पुण्यात शिवजन्म तिथी ठरविण्यासाठी इतिहासकारांची बैठक झाली. त्या बैठकीत शिवजन्म तारीख 19 फेब्रुवारी 1630 ठरविली. परंतु सखोल संशोधन करून शिवजन्म तिथी ही वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 असल्याचे डॉ. नलावडे यांनी सिद्ध केले आहे.
तसेच दादोजी आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. दादोजी हा गरीब इमानी ब्राह्मण होता. त्याने पुण्यातच काय, पण कोठेही सोन्याचा नांगर धरला नव्हता, हेही डॉ. नलावडे यांनी साधार सिद्ध केले आहे.
जेम्स लेनच्या ”शिवाजी : हिन्दू किंग इन इस्लामिक इंडिया” या पुस्तकातील छ. शिवाजी महाराजांवरील सर्व निंदा डॉ. नलावडे यांनी साधार खोडून काढली आहे. तसेचा महात्मा फुले यांची लेनने केलेली बदनामीही धुवून काढली आहे. शिवचरित्रातील चुकांची दुरुस्ती करून जेम्स लेनचे वाभाडे काढणारा हा ग्रंथ मराठी वाचकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
Reviews
There are no reviews yet.