Description
छत्रपती श्री शिवाजी महाराज (1630-1680) यांची भारतातील श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत गणना होते. भारतातील मोगल सत्तेच्या आणि दक्षिणेकडील सल्तनतीच्या पार्श्र्वभूमीवर मराठी राज्याचा उदय आणि विकास पाहताना त्यांच्या थोरवीचा प्रत्यय येतो. ते उत्कृष्ट मुत्सद्दी आणि झुंजार सेनानायक होते. “भारतीय नाविक दलाचे जनक” ऐसे त्यांना यथार्थतने म्हटले जाते. त्यांचा लढा असहिष्णुता, अन्याय आणि वांशिक दुराभिमानाविरुद्ध होता. त्यांचा उद्देश्य होता हिंदवी स्वराज्याची स्थापना, त्यांच्या उदाहरणाने रजपूत, बुंदेले आणि इतरांना स्फूर्ती मिळाली. शिवाजी महाराजांचे राजकीय यश जितके महत्त्वाचे तितकाच त्यांचा आदर्श राज्यधर्म महत्त्वाचा आहे. ते न्यायी प्रशासक होते. त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने कल्याणकारी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष होते.
Reviews
There are no reviews yet.