Description
६ जून १६७४ या दिवशी शिवाजीचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून नवे शक सुरू केले. तो राज्याभिषेक शक या नावाने ओळखला जातो. तो शक किती काळ पाळला गेला? जोपर्यंत शिवाजी आणि त्यांचे वंशज गादीवर बसून स्वत: राज्यकारभार पाहत होते तोपर्यंत हे शक पाळले गेले. जेव्हा राज्यकारभाराचे सर्व अधिकार ब्राह्मण पेशव्यांचे हातात गेले तेव्हा पेशव्यांनी असा हुकूम जाहिर केला की हा शक व्यवहारातून बंद करावा. शिवाजीचा राज्याभिषेक शक बंद करून ब्राह्मण पेशव्यांनी मोगल बादशहाचे फसली शक सुरू केले. एवढेच करून ब्राह्मण थांबले नाही तर याच्याही पुढे त्यांनी मजल मारली. शिवाजीचे वंशज क्षत्रिय आहेत काय, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुन: वाद माजविला.

Reviews
There are no reviews yet.