Description
आपोआप कपडे जळतात. घरातील भांडी इकडे – तिकडे उडतात. स्त्रियांच्या अंगावर, मांडयांवर, वक्ष:स्थळांवर काळ्या फूल्या उमटतात. अंगावरचे कपडे आपोआप फाटतात. अन्नात विष्ठा येऊन पडते. घरावर दगड आदळतात. वस्तू आपोआप नाहीशा होतात, कधीकधी घरावर जाऊन पडतात. तिजोरीतून पैसे नाहीसे होतात. सैतानाचे संदेश येतात. चार-पाच फुटी स्त्री पटकन् उडते, वर कोनाड्यात जाऊन बसते. ज्या घरात हे घडतं ते घर आणि सारा परिसर एका अनामिक भीतीनं थरथर कापू लागतो. हे सारे प्रकार आत्मा घडवून आणतो असं जगभरचे लोक समजतात. त्याला ‘भानामती’ (Poltergiest) म्हणतात. अशा भानामती शोध-प्रक्रियेचं एक खास यशस्वी तंत्र निर्माण केलं त्याच्याच या कथा.
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.